अथणी तालुक्यातील खवटकोप्प गावातील रहिवासी सेवानिवृत्त पोस्टमन मल्लाप्पा अलगौडा होस्पेटी (७२) यांचे काल त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे शरीर बैलहोंगल येथील डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काहेरच्या जगद्गुरू गंगाधर महास्वामी मेडिकल कॉलेजला ला दान करण्यात आले.
प्राचार्य, कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉ. महांतेश रामण्णावर ट्रस्टचे समन्वयक यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी देहदान केल्याबद्दल हॉस्पेटी कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले.
खवटकोप्प येथील रहिवाशांनी आणि शेगुणसी गाव बसवदल युनियनच्या सदस्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाला मृतदेह दान करण्यास मदत केली. काही वर्षांपूर्वी मृताच्या पत्नीनेही मरणोत्तर देहदान दान केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि दोन मुलगे आहेत.



Recent Comments