हुक्केरी शहरात मुस्लिम बांधवांनी बलिदानाचे प्रतीक असलेला ईद सण भक्तीभावाने साजरा केला.
हुक्केरी शहराबाहेरील ईदगाह मैदानावर त्यांनी इब्राहिमच्या कुटुंबीयांच्या बलिदानाचे स्मरण करत सामूहिक प्रार्थना केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना बाबामिया काझी आणि सलीम नदाफ यांनी सांगितले की, पैगंबर इब्राहिम यांनी त्यांच्या बालपणात आणि तारुण्यात अनेक संकटांचा सामना केला आणि देवाने दिलेल्या अनेक सत्त्वपरीक्षेला तोंड देत देवाचे प्रेम जिंकले. त्यांच्या स्मरणार्थ आज जगभरात बकरी ईद साजरी केली जात आहे. यावेळी चांगला पाऊस होऊ दे, भरपूर पीक येवो, जेणेकरुन हिंदू आणि मुस्लिम एकत्र एकसंध जीवन जगू शकतील अशी प्रार्थना करण्यात आली असे सांगितले.
यानंतर गजबरवाडीच्या गजबरसाब दर्गाह येथे विशेष नमाज अदा करून गालीफ अर्पण करण्यात आला. गरीब, श्रीमंत सगळ्यांनीच एक समान पांढरे कपडे घालून प्रार्थना केली. हुक्केरी शहरातील अकरा जमातचे सदस्य सलीम नदाफ, इर्शाद मोकाशी, अहमद बागवान, बाबामिया काझी, केसर मोकाशी, मौलाना उबेद काझी, हाफीज काझी, मौला बागवान, राजू मुजावर, कबीर मल्लिक, सलीम कलावंत, हनिफ मुल्ला, शौकत मकानदार आदी उपस्थित होते.


Recent Comments