Dharwad

त्यागाचे प्रतीक बकरी ईद हुबळीत उत्साहात

Share

त्यागाचे प्रतीक असलेला बकरी ईद हा सण हुबळी या व्यापारी शहरात मुस्लिमांनी सामूहिक नमाज अदा करून साजरा केला.
शहरातील राणी चेन्नम्मा सर्कलजवळील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी सामूहिक नमाजपठण करून शांतता आणि समृद्धीचा संदेश दिला. कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, कोर्ट सर्कल, रेल्वे स्टेशन रोड ते लॅमिंग्टन स्कूल या रस्त्यावर जमलेल्या लोकांनी प्रार्थना केली.


कारवार रोडवरील ईदगाह मैदानावरही नमाज अदा करण्यात आली. प्रार्थनेनंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुस्लिम समाजाचे नेते ए एम हिंडसगेरी, आय जी सनदी, महंमद युसूफ सावनूर, अल्ताफ कित्तूर, अल्ताफ हुसेन हळ्ळूर आदी सहभागी झाले होते.

Tags: