गवत खाण्याच्या प्रयत्नात सेप्टिक टँकमध्ये पडलेल्या म्हशीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना धारवाड जिल्ह्यातील यरीकोप्प गावात घडली.
चरायला गेलेली म्हैस घरगुती सेप्टिक टँकमध्ये पडून काही काळ अडकल्याची घटना यरीकोप्प गावात घडली. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी म्हशीची सुटका केली.
धारवाड तालुक्यातील यरीकोप्प गावातील रहिवासी असलेल्या शिवपुत्रप्पा अंगडी यांनी नेहमीप्रमाणे घरातील म्हशीना बाहेर काढून चरायला सोडले होते. यावेळी एक म्हैस गवत खाण्याच्या प्रयत्नात घरामागील सेप्टिक टँकमध्ये पडली. म्हशीचे हंबरणे ऐकून स्थानिकांनी म्हशीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र म्हशीला वर काढता न आल्याने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. स्थानिकांच्या माहितीवरून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अखेर म्हशीला सुखरूप वर काढून तिचे प्राण वाचवले.
Recent Comments