धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या निषेधार्थ बेळगावात आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी येताना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांची माजी मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबियांना आर्थिक मदतही दिली.


शिवपूरच्या मुप्पीनमठाचे पूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी व पांडुरंग जाधव वय 75 वर्ष राहणार बाचनी, जिल्हा कोल्हापूर व पंचाक्षरी हिरेमठ तरुण 26 वर्ष परकनट्टी, तालुका हुक्केरी हे आंदोलनात भाग घेण्यासाठी येत होते. त्यावेळी त्यांच्या कारला अपघात होऊन स्वामीजी जखमी झाले तर अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला. माजी मंत्री ईश्वरप्पा यांनी जाधव व हिरेमठ यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांना प्रत्येकी 75 हजार रुपयांची मदत दिली. तसेच स्वामीजींची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस करून 50 हजार रुपये मदत शिमोगा विश्व हिंदू परिषद आणि बेळगाव जिल्हा विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिली. ईश्वरप्पा यांनी त्यांना धीर देऊन प्रदेश भाजपकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विश्व हिंदू परिषद शिमोगा अध्यक्ष वासुदेव, सचिव नारायण वेर्णेकर, बेळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम उपाध्यक्ष प्रमोदकुमार वकुंदमठ, विवेकानंद पुजार, प्रांत कोषाध्यक्ष कृष्णा भट, संजय पाटील, कृष्णा पाटील, डॉक्टर राजेश नेर्ली., श्रीमंत धनगर, लक्ष्मण तापसी, गोविंद कोप्पद आदी उपस्थित होते.


Recent Comments