बेळगाव शहरात तसेच जिल्हाभरात , मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला . शेकडो मुस्लिमबांधवानी इद -उल -अजा चे नमाज पठण करून , जगाचे कल्याण आणि पावसासाठी प्रार्थना केली .

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा एक महत्वाचा सण आहे . या दिवशी या ईदचे नमाज पठण करून , मुस्लिम बांधव पशूंची कुर्बानी देतात . आजच्या दिवशी शहर तसेच आसपासच्या भागातील मुस्लिम बांधव बेळगावच्या ईदगाह मैदानावर तसेच स्थानिक मशिदींमध्ये इद -उल -अजा चे नमाजपठण केले . अब्दुल रझाक मोमीन , सिराज अश्रफी यांनी नमाजपठण केले यानंतर मुफ्ती अब्दुल अझीझ काझी , मुफ्ती जुहेर अहमद काझी, मुफ्ती मंजूर आलम यांनी बकरी ईद सणाचे महत्व सांगितले . तसेच आम्ही जी निसर्गाची , पर्यावरणाची हानी करीत आहोत त्यामुळे निसर्गचक्र बिघडून , सर्व पर्यावरणीय बदल घडत आहे .आणि याचा परिणाम मानवजातीसह सर्व चराचराला भोगावा लागत आहे . त्यामुळे विश्वशांती, समता , बंधुता , राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा तसेच पावसासाठी सामुदायिक प्रार्थना केली .
त्यानंतर मुस्लिमबांधवानी , एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी बोलताना आ . आसिफ उर्फ राजू सेठ यांनी , सर्वाना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या . ते म्हणाले कि ,बेळगाव शहरातच नाही तर पूर्ण देशभरात ईद साजरी केली जात आहे . सर्वानी आनंदाने ईद साजरी करा . आपापसात बंधूभाव , प्रेम कायम राखा . सर्वानी मिळून मिसळून रहा . असे ते म्हणाले .
माजी आ . फिरोज सेठ यांनी देखील सर्वाना ईदच्या शुभेच्छा दिल्या . जे काही आपले रीतिरिवाज आहेत ते कायदयाच्या चौकटीत राहून पाळा . आपल्या एखाद्या गोष्टीमुळे कोणाचे मन दुखावणार नाही असे आपल्याला वागायचे आहे . इतरानी देखील आम्ही दुखावणार नाही ते वागावे , तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल आणि याच्याशी आमच्या सर्वांच्या मुलांचे भविष्य जोडले गेले आहे असे म्हणून त्यांनी सर्वाना पुन्हा एकदा ईदच्या शुभेच्छा दिल्या . ( )
यावेळी बेळगाव उत्तरच्या आमदारपदी निवडून आलेल्या आसिफ उर्फ राजू सेठ यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले .
एकंदर बेळगाव शहरात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडला .


Recent Comments