Belagavi

विद्यार्थ्यांनी घ्यावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा लाभ

Share

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. असे कर्नाटक औद्योगिक प्रशिक्षण व रोजगार विभागाचे संचालक नागेंद्र होन्नल्ली यांनी सांगितले .
त्यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.


नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिकण्यापासून दूर राहू नये आणि कमी गुण मिळालेले विद्यार्थी त्यांच्या जवळच्या आयटीआय प्रशिक्षण केंद्रात कमी शुल्कासह कौशल्य आधारित प्रशिक्षण घेऊन कोणत्याही उच्च वयोमर्यादेशिवाय त्यांचे शिक्षण सुरू ठेवू शकतात. सरकार युवक-युवतींना रोजगार आणि आर्थिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने अनेक प्रशिक्षण कौशल्य आधारित प्रशिक्षण देत आहे.त्याचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.
त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील यमकनमर्डी गावात नवीन आयटीआय प्रशिक्षण केंद्राच्या कामाचे उद्घाटन केले.
यावेळी विभागाचे सहसंचालक पी रमेश, बेळगाव महिला आयटीआय केंद्राच्या प्राचार्या चिदानंद बाके आदी उपस्थित होते.

Tags: