Belagavi

बी एस चन्नबसप्पा मॉलचा प्रथम वर्धापनदिनानिमित्त कामगारांच्या कार्याची दखल घेऊन दिली बक्षिसे

Share

बेळगावमधील बी एस चन्नबसप्पा मॉलच्या , २६ जून रोजी पार पडलेल्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त, कर्मचाऱ्यांच्या उत्तम सेवेची दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आले .
फक्त एका वर्षात उत्तर कर्नाटकात , महाराष्ट्र तसेच गोव्यामध्ये बी एस चन्नबसप्पा मॉल उत्तम दर्जाच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध झाले आहे . दररोज हजारो लोक या मॉलमध्ये कपडे खरेदीसाठी येत आहेत . या मॉलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त ,या दिवशी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी , संचालक उमापती , बी सी शिवकुमार , बियुसी शेखर , विवेक बंकापूर , बी एस मृणाल , बी सी वेद उपस्थित होते .
यावेळी बोलताना संचालक बी सी शिवकुमार आणि इतर संचालकांनी सांगितले आम्ही जी काही एका वर्षात वाटचाल केली आहे त्याला तुम्ही सर्व कर्मचारी वर्गाची साथ आहे . तुमच्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही ५४ बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामध्ये २० सेल्स सुपरस्टार ऍवार्ड ,

२० रायजिंग स्टार ऍवार्ड , ५ डिसिप्लिन मास्टरी ऍवार्ड, तसेच अन्य बक्षिसे देणार आहोत . तसेच कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन आर्थिक साहाय्य केले जाणार आहे . असे ते म्हणाले .

अत्यंत कमी कालावधीत प्रसिद्ध झालेल्या या बी. एस. चन्नबसप्पा मॉलची आणखी भरभराट होवो याच सदिच्छा

Tags: