Dharwad

विविध मागण्यांच्या पूर्ततेची अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन

Share

अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघातर्फे हे आंदोलन करण्यात आले.
आरोग्य विभागाने ई-सर्वेक्षणातून सूट द्यावी. वेगवेगळ्या विभागाच्या कामावर नियुक्त करू नये. खराब गुणवत्ता आणि खराब झालेले मोबाईल परत करावेत. अंगणवाड्यांना दर्जेदार अंडी वाटप करण्यात यावीत . अंगणवाडी केंद्रांचे भाडे तातडीने अदा करण्यात यावे. अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी यावेळी करण्यात आली .

Tags: