Belagavi

बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकपदी विकास कुमार रुजू

Share

बेळगाव उत्तर विभागाचे नूतन पोलीस महानिरीक्षक म्हणून विकास कुमार यांनी पदभार स्वीकारला . बेळगाव उत्तरचे पोलीस पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांच्या रिक्त जागी गृह खात्याने , विकास कुमार यांची नियुक्ती केली आहे . बुधवारी त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली .

प्रारंभी , बेळगाव पोलीस विभागाच्या वतीने , नूतन आयजीपी विकास कुमार याना मानवंदना देण्यात आली . यानंतर आयजीपी विकास कुमार यांनी , बेळगाव पोलीस अधिकाऱ्यांची ओळख करून घेऊन संवाद साधला .
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ . संजीव कुमार पाटील यांनी नूतन आयजीपी विकास कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
यावेळी बोलताना आयजीपी विकास कुमार म्हणाले कि , बेळगाव उत्तर वलयचे पोलीस महासंचालक पदाची सूत्रे आज मी स्वीकारली आहे . २००५ साली बेळगावमध्ये प्रोबेशनरी एसपी म्हणून आपण सेवा बजावली होती . त्यानंतर १८ वर्षांनी पुन्हा बेळगावमध्ये आयजीपी म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळाली आहे . कायदा आणि सुव्यवस्थ अबाधित राखण्यासाठी , जनता आणि पोलीस खात्यामध्ये समन्वय साधून सहकार्याने काम करू . जनतेसाठी मी कोणत्याही वेळेत उपलब्ध राहीन असे नूतन आयजीपी विकास कुमार यांनी सांगितले .
यावेळी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक , डीएसपी , तसेच विविध पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते .

Tags: