जून महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी सर्वच विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांमध्ये हजेरी लावताना दिसत नाही . खेड्यापाड्यातून , शहरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसची अडचण होत आहे, कारण कर्नाटकातील नवीन सरकारने ‘शक्ती योजने’अंतर्गत महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे.
कर्नाटकातील नवीन सरकारने ‘शक्ती योजने’अंतर्गत महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे . त्यामुळे बसेसना महिलांची जास्त गर्दी दिसून येत आहे . याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे . बसला महिलांची गर्दी असल्याने , विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांना वर्गांना व्यवस्थित उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसणे कठीण झाले आहे. साधारणत: गावात पुरेशा बसेस धावत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायीच शाळा, महाविद्यालयात जावे लागते. या बसच्या समस्येमुळे हावेरी येथे बसमध्ये चढताना एका विद्यार्थ्याचा अपघात झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विद्यार्थ्यांसाठी अधिक बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी करून शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने
मोर्चा काढण्यात आला .
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रतिनिधी प्रितम उपरी याने सांगितले कि , विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी बसची संख्या वाढवावी आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.भविष्यातील प्रकल्पांमध्ये पुरुष विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा तसेच मुलींना मोफत बस प्रवास उपलब्ध करून द्यावा. ( )
एकंदर सरकारने महिलांसाठी सुरु केलेल्या मोफत बस प्रवास योजनेचा लाभ महिलांना मिळत असला तरी याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे . महिलांच्या होणाऱ्या गर्दीमुळे , विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नसल्याने त्यांना शाळा महाविद्यालयात वेळेवर पोचणे मुश्किल झाले आहे . सरकारने याचा विचार करून , विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस सोडण्याची विनंती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली आहे .
Recent Comments