रोटरीच्या वतीने प्रत्येक वेळी काही अनोखा कार्यक्रम केला जातो काळाची गरज समजून खेडेगावातील मुलींकरता सायकल वितरण करण्यात आले या उडान उपक्रमात बऱ्याच खेड्यातील हायस्कूल शाळेच्या मुलींचा सहभाग होता त्यामध्ये बेळगाव मधील रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल च्या वतीने या वर्षांमध्ये बरीच अशी उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये सायकल वितरण हा कार्यक्रम अतिउत्साहात सर्वांनी सहभाग होऊन काम केले यामध्ये रोटरीचा असा उद्देश होता की खेडेगावातील मुलींना शाळेला येण्यासाठी किमान तीन-चार किलोमीटर चालत जावे लागते त्यामध्ये ते शाळेमध्ये वेळेवर पोहोचू शकत नाही त्याकरता त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना लाभ व्हावा व त्यांचे शिक्षण सुरळीत व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये टॉपिंग कट्टी खानापूर, कुरली निपाणी, गुंजी, जांबोटी अशा आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थी मुलींनी याचा लाभ घेतला या कार्यक्रमाच्या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल चे अध्यक्ष रोटेरियन रवी हत्यारगी सेक्रेटरी अमित पाटील इव्हेंट चेअरमन माधवानंद कारेकर अपकमिंग प्रेसिडेंट मंजुनाथ आळवणी, अभय जोशी ,किरण इनामदार ,
रोटेरियन दामोदर लोहार व क्लब मेंबर अति उत्साहाने उपस्थित होते त्यावेळी शाळेचे शिक्षक वर्ग व पालक सुद्धा उपस्थित होते सायकल वितरण केल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला त्यावेळी अध्यक्ष व क्लबच्या सदस्यांनी त्यांना मार्गदर्शन केले सायकलीचा योग्य असा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये एक आदर्श निर्माण व्हावा अशी रोटरीच्या वतीने विनंती करण्यात आली
Recent Comments