Belagavi

अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र वितरण प्रशिक्षणाचे आयोजन

Share

जनतेचे आरोग्य उत्तम राखण्याच्या दृष्टीने , केंद्र सरकारच्या आदेशानुसार , शहरातील हॉटेल्स , दुकाने , स्वीट मार्ट मध्ये स्वच्छता कशी राखली जाईल या संदर्भात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे .

शहरात , रेस्टोरंट , हॉटेल्स , दुकाने , तसेच मेडिकल शॉप आदी ठिकाणी स्वच्छता कशी राखावी , निर्जंतुकीकरण कसे करावे , अन्न सुरक्षा याबाबत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रे देण्याचा दोन दिवसीय कार्यक्रम कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेला आहे .

या कार्यक्रमात मुंबईचे नरसिंह भट हे प्रशिक्षण देत आहेत .

या प्रशिक्षणाविषयी माहिती देताना आरती अक्कतंगेरहाळ यांनी या प्रशिक्षणासंदर्भात आपली मराठीला अधिक माहिती दिली .

या प्रशिक्षणाचा लाभ शहरातील अनेक दुकानदार , हॉटेल मालक आणि त्यांच्या प्रतिनिधींनी घेतला

Tags: