मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहे , आणि या मुलांचे भविष्य शिक्षकच घडवतात असे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ म्हणाले .
मंगळवारी , बेळगावमधील महिला विद्यालय प्राथमिक शाळेत , वेदांत फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांशी आयोजित केलेल्या शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते . ते म्हणालेकी , अनेक संघसंस्था समाजाच्या कल्याणासाठी काम करीत असल्यानेच समाजात बदल घडत आहेत . वेदांत संस्था देखील त्यापैकी एक आहे . मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहे . देशाला उन्नत पथावर नेणारी ही मुलेच आहेत . आणि त्यांना घडवण्याचे काम शिक्षकच करतात . त्यांची काळजी करणे , देखभाल करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे .
शिक्षण चांगले असेल तर मुले चांगली बनतात . सर्वांचे भविष्य घडवणारे शिक्षकच असतात . आज मी देखील माझ्या शिक्षणामुळेच या पदावर पोचलो आहे . असे सांगत त्यांनी शिक्षकांचा गौरव केला
यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले .
यावेळी महेश फाउंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव, लीलादेवी प्रेमराज चिंडक, रामू गौडवाड , वाय जे भजंत्री , आय डी हिरेमठ , बानू सोगलंनावर आणि इतर मान्यवर आणि वेदांत फाऊंडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .


Recent Comments