तलावात मासेमारी करताना तराफा उलटल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील तरणा तलावात ही घटना घडली .
विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील तरणा तलावात घडली.. १७ वर्षीय मंजुनाथ शिवाप्पा चलवादी असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे . घरच्यांना न सांगता दोघे तरुण , तलावात जाळे टाकून मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यानंतर तराफा उलटला आणि तरुण बुडाले. हा प्रकार तिथून चालेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आला आणि त्यांनी एकाला बुडताना वाचवले . वाचलेल्या तरुणाने भीतीपोटी आपला मोबाईल फोन बंद केला आणि तो बेपत्ता झाला आहे .
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून अंधारात कारवाई केली, मात्र मृतदेह सापडला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा कारवाई सुरू झाली.
अग्निशमन दलाचे जवान त्यांच्या साधनांचा वापर करून बचाव कार्यात सहभागी झाले होते. अखेर गावातील तरुणांनी हिंमत दाखवून तलावात शोध घेतल्यानंतर मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मुद्देबिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Recent Comments