वाहनांमध्ये वापरलेल्या डिझेलची थकबाकी भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या मालकाने एका व्यक्तीला अर्धनग्न करून डिझेल पंपामध्ये बसवून ठेवल्याची अपमानास्पद घटना विजापूर जिल्ह्यात घडली आहे.
विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ शहरात ही घटना घडली आहे . भोसले पेट्रोल डिझेल पंप भरत भोसले यांच्या मालकीचा असून मौनेश पत्तार नावाच्या व्यक्तीला अर्धनग्न अवस्थेत ठेवण्यात आले आहे . मौनेश पत्तार याने 10 ते 15 लाख रुपयांची , डिझेलची थकबाकी भरावी असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात येत आहे . . गेल्या 12 दिवसांपासून मौनेश पत्तार याला अर्धनग्न अवस्थेत पेट्रोल पंपात ठेवण्यात आले आहे .
तामिळनाडूतील शिवशक्ती बोअरवेलमध्ये काम करणाऱ्या मौनेश याने शिवशक्ती बोरवेलच्या वाहनांसाठी भोसले यांच्या पंपातून डिझेल टाकले होते, शिवशक्ती बोअरवेलची वाहने , डिझेलची थकबाकी न भरता निघून गेली. मौनेश पत्तार याला मारहाण करून अर्धनग्न करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मौनेशाच्या सुटकेसाठी पत्नी व मुले भोसले पेट्रोल डिझेल पंपात येथे बसून आहेत.
पत्नी रंगम्मा, मुले सौम्या, स्नेहा, संदेश आणि चंद्रू हे सर्व पेट्रोल पंपात बसून आहेत. पेट्रोल पामपचा मालक मौनेश च्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाऊ नये यासाठी त्रास देत आहे.
ही घटना मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे . (फ्लो )
Recent Comments