विजेचे दर कमी करावेत तसेच जमीन संपादित करून बेळगाव ते कित्तूरमार्गे नवीन धारवाड रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे, अशी मागणी करून , करवेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.

या संदर्भात माहिती देताना करवे नारायण गौडा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी सांगितले कि , काँग्रेस सरकारने गरीब आणि मागासवर्गीयांच्या हितासाठी जाहीर केलेल्या पाच हमी योजना चांगल्या आहेत. मात्र विजेचे दर वाढल्याने तसेच घरातील वापरासाठी व इतर कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या मीटरचे भाडे व युनिटचे दर वाढल्याने राज्यातील जनता नाराज झाली आहे. मागील सरकारने वीज दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मागील सरकारने धर्मांतर बंदी कायदा आणि गोहत्या बंदी कायदा अमलात आणला तो रद्द काण्यात आला आहे . वीज दर कमी करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

बेळगाव जिल्ह्यातील लोक बेंगळुरूपर्यंत रेल्वे प्रवासापासून वंचित आहेत. कारण लोंढा मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांना जास्त वेळ आणि जास्त किमी लागतात. यामुळे सर्व रेल्वे सेवा फक्त हुबळी-धारवाडपर्यंतच मर्यादित राहणार आहेत. त्यामुळे रेल्वे विभागाने लवकरात लवकर बेळगाव ते धारवाडला कित्तूर मार्गाने जोडणाऱ्या रेल्वे लाईनसाठी जमिनी संपादित करून त्या रेल्वे विभागाकडे सुपूर्द करून कित्तूर, धारवाड मार्गावरून बेळगावातील लोकांचा वेळ वाचेल अशी व्यवस्था करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली .
या आंदोलनात महादेव तळवार , सुरेश गवन्नावर , गणेश रोकडे , महेश शीगीहळ्ळी आणि अन्य करवे कार्यकर्ते सहभागी झाले होते .


Recent Comments