Belagavi

नदीकिनारी कचऱ्यात फेकून दिलेले देवदेवतांचे फोटो केले संकलित

Share

सर्व लोक सेवा मंडळाचा वतीने , मार्कंडेय नदी किनारी कचऱ्यात फेकून देण्यात आलेले देवदेवतांचे फोटो संकलित करण्यात आले .
व्हॉइस ओव्हर : सर्व लोक सेवा संस्थेचे अध्यक्ष विरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी , रविवारी सकाळी , मार्कंडेय नदीकिनारी भेट दिली . मार्कंडेय नदीच्या पुलाखाली कचऱ्यात फेकून देण्यात आलेले भग्नावस्थेतील देवदेवतांचे फोटो संकलित करण्यात आले .


विरेश हिरेमठ हे गेल्या अनेक वर्षांपासून , असे फोटो संकलित करीत आहेत . देवदेवतांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे . लोक आपल्या घरातील जुने, जीर्ण झालेले देवदेवतांचे फोटो , झाडाखाली , नदीकिनारी किंवा मंदिराशेजारी नेऊन ठेवतात . काही जण तर कचऱ्यात सुद्धा हे फोटो टाकून देत आहेत . त्यामुळे आपल्या देवदेवतांची विटंबना होते . असे टाकून दिलेले फोटो संकलित करून ,विरेश हिरेमठ त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने दहन करतात . आजही त्यांनी , आपल्या सहकाऱ्यांसमवेत , मार्कंडेय नदी किनारी जाऊन , कचऱ्यात फेकून दिलेले फोटो संकलित केले . (फ्लो)
यावेळी सर्व लोक सेवा मंडळाचे सदस्य उपास्थी होते .

Tags: