अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कर्नाटक-महाराष्ट्रात वरुणरायाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. आपापल्या पद्धतीने तो आता देवाचे आभार मानू लागला आहे. या पार्श्वभूमीवर भर पावसात चिंब भिजून देवाचे आ
भार मानणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळ्ळूर गावातील शेतकरी शनिवारी पहिल्या पावसात उभा राहून देवाची प्रार्थना करतो. शंभो देव परम भगवान आहे, म्हणत पाऊस दे, असे आवाहन करत गुरुदेव गुरुदत्त म्हणत, पावसात चिंब भिजत देवाला हाताने चुंबन देत हा शेतकरी देवाचे आभारही मानतोय.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत आपल्या नृत्याने पावसाचे स्वागत करणारा हा शेतकरी पाहून बळीराजा पावसासाठी किती आसुसलेला आहे याची कल्पना येते.
एका शेतकऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Recent Comments