Belagavi

महेश फौंडेशनमध्ये मुलांच्या नव्या वसतिगृहाचे उद्घाटन

Share

महेश फौंडेशनने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. मुलांच्या नव्या वसतिगृहाचे उद्घाटन केले आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो असे उद्गार राईट्स लिमिटेडचे संचालक लक्ष्मण तापशी यांनी काढले.

बेळगावातील कणबर्गी परिसरातील महेश फौंडेशनच्या नव्याने उभारलेल्या मुलांच्या वसतिगृहाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे, महेश फौंडेशन वंचित मुलांना समाजात स्वतंत्र आणि सक्रिय योगदान देण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते. महेश फौंडेशनने ५०हुन अधिक वैद्यकीयदृष्ट्या विकलांग मुलांसाठी नवीन वसतिगृह उपलब्ध करून दिले आहे.

नव्या वसतिगृहात सर्वोत्कृष्ट सुविधा आहेत. वसतिगृहाचे उदघाटन करून बोलताना लक्ष्मण तापशी म्हणाले की, मला या अद्भुत संस्थेला भेट देऊन खूप आनंद झाला, महेश फौंडेशनसारखी संस्था असणे आपल्यासाठी खूप भाग्यवान आहे. येथे मुलांना दिले जाणारे शिक्षण व इतर सुविधा उत्तम आहेत. त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कायदा सल्लागार प्रिया तापशी म्हणाल्या की, या अद्भुत संस्थेकडे पाहून मला खूप आश्चर्य वाटते. मी खूप भाग्यवान आहे की मला या ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली. महेश फौंडेशनने या मुलांसाठी जे केले ते खरोखरच उदात्त कार्य आहे. याआधी मी इतकं चांगलं, सुस्थितीतलं वसतिगृह पाहिलं नाही, मुलांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा जागतिक दर्जाच्या आहेत. महेश फौंडेशनच्या भावी वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा असे त्यांनी सांगितले

महेश फौंडेशनचे संस्थापक महेश जाधव उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, “हे मुलांचे वसतिगृह वैद्यकीयदृष्ट्या विकलांग मुलांसाठी सुरक्षित निवारा सुनिश्चित करेल. आम्ही भाग्यवान आहोत की या अनमोल क्षणी लक्ष्मण तापशी आमच्यासोबत आहेत.

त्यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. लक्ष्मण तापशी यांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या मानवतावादी सेवेचा गौरव करून, त्यांनी महेश फौंडेशनच्या भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली. बाईट.
यावेळी महेश फौंडेशनची मुले, कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवक उपस्थित होते.

Tags: