Agriculture

मंगेशकेरेजवळ अस्वलांच्या वावरामुळे जनता भयभीत

Share

कलघटगी जवळील मंगेशकेरेजवळ दोन अस्वल दिसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कलघटगी शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या मंगेशकेरेजवळ अस्वल पाहून आजूबाजूचे लोक घाबरले आहेत.सकाळी फिरायला गेलेल्या तरुणांना अस्वल दिसले, अस्वल पाहणाऱ्या तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. डोंगराळ भाग असलेल्या कलघटगी तालुक्यात पाणवठे कोरडे पडले आहेत. गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे .


उरलेल्या काही झऱ्यांमध्ये वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत आहेत. जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर वन्य प्राणी क्वचितच दिसतात. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे ते पाण्याच्या शोधात येत असल्याचे प्राणीतज्ज्ञ सांगतात.

अस्वलाच्या वावरामुळे कलघटगी शहराच्या आसपासच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने अस्वलाला पुन्हा जंगलात सोडावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags: