समाज सेवेत नेहमीच अग्रेसर असणा-या रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे कोविड-19 बाधित कुटुंबातील आणि इतर आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी “शिक्षा का सहारा” हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मंगळवार 27 जून रोजी त्याचे उदघाटन करण्यात येणार आहे.

बेळगावात आज पत्रकार परिषदेत याची माहिती देताना क्लबचे पदाधिकारी डॉक्टर जयसिंह आणि माजी अध्यक्ष अशोक नायक यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या गोगरीब व गरजू मुलांना आर्थिक सहाय्य आणि कोणत्याही अडचणींशिवाय त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक सहाय्य प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे. क्लबने आधीच 400 विद्यार्थी निश्चित केले आहेत. यापैकी 100 मुलांनी एक किंवा दोन्ही पालक कोविड-19 मुळे गमावले आहेत. त्यांना काही वर्षांसाठी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत आणि त्यांचा शैक्षणिक खर्च आणि शैक्षणिक साहित्य अशी मदत केली जाणार आहे. यासोबतच क्लब 15 विद्यार्थिनींना सायकली देणार आहे.

मंगळवार 27 जून रोजी दुपारी 2.30 वाजता भाग्यनगर, बेळगाव येथील रामनाथ मंगला कार्यालयात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य उच्च शिक्षण, धारवाडचे संचालक डॉक्टर शिवप्रसाद, निवृत्त प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ सहभागी होणार आहेत. शहर गटशिक्षणाधिकारी रवी भजंत्री आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे हे विशेष निमंत्रित असतील. माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमात क्लबचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत असे त्यांनी सांगितले. बाईट + बाईट.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments