Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची एमएसपीसी सेंटरला अचानक भेट

Share

बेळगाव येथील एमएसपीसी (महिला पूरक उत्पादन केंद्र) केंद्राला गुरुवारी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अचानक भेट दिली. तेथील निकृष्ट अन्न व अव्यवस्था पाहून त्यांना धक्काच बसला.

मंत्री हेब्बाळकर यांनी अंगणवाडीतील बालके, गरोदर महिला आणि बाळंतिणींना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या बेळगावातील हलगा येथील एमएसपीसी सेंटरला अचानक भेट दिली. तेथील परिस्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. याबाबत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मंत्र्यांनी केंद्राला भेट दिली असता निकृष्ट दर्जाचे अन्न साठविल्याचे आढळून आले. संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा अभाव पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. संपूर्ण एमएसपीसी सेंटरमध्ये अव्यवस्था पसरली होती. हे सर्व पाहून शासनाचा पौष्टिक आहार देण्याच्या मूळ उद्देशालाच येथे तडा गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


या खात्याची मंत्री म्हणून मी ही व्यवस्था सहन करू शकत नाही. राज्यातील बालके, गरोदर महिला व बारंगे यांना पोषक आहार मिळावा. प्रकल्पाचा उद्देश सफल झाला पाहिजे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण प्रकल्प अयशस्वी होऊ नये. लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि बाळंतिणींना अन्यायकारक वागणूक देऊ नये. त्यामुळे मी राज्यातील विविध जिल्ह्यांतील एमएसपीसी केंद्रांनाही भेट देऊन तेथील व्यवस्था तपासणार आहे. मी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कार्यवाही करेन, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

Tags: