Belagavi

बीम्सच्या बीएससी नर्सिंग तसेच जीएनएम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा दीपदान आणि शपथविधी

Share

बीम्सच्या बीएससी नर्सिंग च्या १२व्या बॅचच्या तसेच जीएनएम नर्सिंगच्या १०६ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा दीपदान आणि शपथविधी समारंभ पार पडला .
शहरातील , बीम्स कॉलेजच्या नूतन सभागृहात , या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . बीम्सचे डीन आणि संचालक डॉ . अशोक कुमार शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काहेर चे प्राचार्य विरेशकुमार नंदगाव उपस्थित होते . या कार्यक्रमामध्ये नर्सिंगच्या विध्यार्थ्यानी हातात मेणबत्ती घेऊन आपल्या सेवेची शपथ घेतली .


यानंतर बोलताना , प्राचार्य प्रदीप माळगी यांनी सांगितले कि , यावर्षी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे .तसेच काही विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे . या संस्थेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी , हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावू शकतात . सुमारे ३५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . या वर्षीपासून एमएससी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होत आहे . सर्व विद्यार्थ्यांनी , सरकारी महाविद्यालयातील या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .प्रमुख पाहुणे , विरेशकुमार नंदगाव म्हणाले कि, अनेक विद्यार्थी व्यावसायिक कोर्स निवडून आपली भविष्य सुरक्षित करीत आहेत . परंतु तुम्ही नर्सिंग क्षेत्र निवडून , लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहात . वैद्यकीय क्षेत्रात नर्सिंगला सुद्धा फार महत्व आहे . या क्षेत्रात सुद्धा तुम्ही जसे शिक्षण घ्याल तसे हे क्षेत्र विस्तारित आहे . समाजात वृद्ध माणसांकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास कोणी तयार नाही . त्यांचे कुटुंबीय यासाठी नर्सेसना नेमत आहेत . नर्सिंग क्षेत्राला सध्या खूप महत्व प्राप्त झाले आहे . त्यामुळे शिक्षणाचा सदुपयोग करून तुम्ही उत्तम रित्या जनसेवा, रुग्णसेवा करा असे आवाहन केले .


विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली .
यावेळी बीम्सचे प्राचार्य तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ . ए बी पाटील ,डॉ . सुधाकर , ग्लॅडीस कस्तुरी , डॉ . सरोज तिगडी , प्राचार्य प्रकाश कोडली आणि विध्यार्थी उपस्थित होते .

Tags: