Crime

महादेव भैरगोंडा टोळीच्या गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीला जमीन

Share

भीमातीरावरील गुंड महादेव भैरगोंडा टोळीच्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी मदुस्वामी हिरेमठ याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मदुस्वामीची बुधवारी संध्याकाळी तुरुंगातून सुटका झाली. उच्च न्यायालयाने अटींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला. मदुस्वामीची तुरुंगातून सुटका झाल्यामुळे समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. अमोघसिद्धेश्वर मंदिरात रात्री उशिरा मदुस्वामी समर्थकानी नारळ फोडले .
गेल्या नोव्हेंबर 2020 रोजी महादेव भैरगोंडावर गोळीबार झाला . यावेळी महादेव भैरगोंडा बचावले हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. हल्ल्यादरम्यान महादेव भैरगोंडा यांच्यावर 6 राऊंड गोळीबार करण्यात आला.
या टोळीयुद्धात कारचालक लक्ष्मण दिंडोरे, व्यवस्थापक बाबुराई कांचनळकर यांचा मृत्यू झाला. मदुस्वामी हिरेमठ ए1 आरोपी असलेल्या चडचन टोळीतील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या मदुस्वामीना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Tags: