Banglore

गॅरंटी देता येत नसतील तर खुर्ची सोडा : येडियुरप्पा

Share

सर्व पाच गॅरंटी देता येत नसतील तर खुर्ची सोडा असे आव्हान माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांना दिले आहे.

माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी दावणगेरे येथे काँग्रेसवर जोरदार टीका केली. जर सर्व 5 हमींची अंमलबजावणी झाली नाही तर त्यांनी सत्ता सोडावी. लोकांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस रोज एक नाटक करत आहे. सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारला विचारून तांदूळ देण्याचे आश्वासन जनतेला दिले का? काँग्रेसने निवडणूक जिंकण्यासाठी हे आश्वासन दिले आहे.

केंद्र सरकार आधीच प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ देत आहे. सिद्धरामय्या यांनी लोकांना दिलेल्या आश्वासनानुसार

10 किलो तांदूळ द्यावा. 10 किलो तांदूळ देऊ शकत नसाल तर त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी येडियुरप्पानी केली.

Tags: