Belagavi

खानापूर शासकीय कॉलेजला सुविधा द्या : मेघा देसाई

Share

खानापूर शहरातील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालय व वसतिगृहात सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव मेघा देसाई यांनी

सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले.
खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसजवळ शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची इमारत बांधण्यात आली आहे.

परंतु तेथे बेड, किचन रूमसाठी साहित्य, कर्मचारी, वसतिगृहासाठी संरक्षक भिंत इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत असून, आता या महाविद्यालयात सुमारे 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु महाविद्यालयात संगणक,

प्रिंटर, झेरॉक्स-मशीन, महाविद्यालयासाठी संरक्षक भिंत आणि सुमारे 600-700 विद्यार्थी बसू शकतील असे एक सभागृह हॉल या सुविधा देण्याची गरज आहे. महाविद्यालयात कायमस्वरूपी शिक्षकेतर कर्मचारी नाहीत. या सुविधा पुरविण्याची मागणी मेघा देसाई यांनी मंत्री जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.

Tags: