धारवाड शहरातील नारायणपूर येथील दासनकोप्प सर्कल ते केळगेरी वसाहत हा मुख्य रस्ता काँक्रीटचा रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाची पाहणी आमदार अरविंद बेल्लद यांनी केली.

5 कोटी खर्चून सुसज्ज काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येत असून, स्थानिकांच्या सूचना घेऊन चांगला रस्ता होण्यासाठी व त्याचा फायदा स्थानिकांना होण्यासाठी हे काम लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदाराला दिल्या.
यावेळी आमदार अरविंद बेल्लद यांनी स्थानिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी नगरसेवक विजयानंद शेट्टी, मंजुनाथ बुट्टेन्नवर व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.


Recent Comments