Belagavi

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाकडून आयोजन

Share

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, महांतेश नगर बेळगाव व जिल्हा जीवन विभाग व युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 9 वा राष्ट्रीय योग दिन किणये गावातील ब्रह्मकुमारी कॅम्पस येथे साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय समन्वयक राजयोगिनी ब्रह्मकुमारी अंचिकाजी होत्या. आपण आपल्या कर्माने राजा व्हायला हवे. प्रत्येकाने समाजात एकोप्याने राहावे.

ब्रह्मकुमारी विद्याजी म्हणाल्या कि , जगाच्या मनावर विजय मिळवला तर जग जिंकल्यासारखे आहे. शिवाजी बेकवाडकर यांनी केवळ एक दिवस नाही तर रोज योगा करावा असे सांगितले .

साउंड हीलिंग सेंटर बेळगावचे नागेंद्र पाटील यांनी ध्वनी उपचार करून त्याचे महत्त्व सांगितले. मनासाठी योगाची गरज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील विविध ठिकाणचे ब्रह्मकुमार आणि ब्रह्मकुमारी , तसेच 750 हून अधिक लोकांनी येऊन राजयोग साधला हे विशेष

Tags: