एकसंबा शहरात जागतिक योग दिन सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. जोल्ले उद्योग समूहाने आयोजित केलेल्या जागतिक योग दिन सोहळ्यात 7 हजारहून अधिक योगसाधकांनी एकाचवेळी योगासने करून उत्स्फूर्त सहभागी घेतला.

चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथे जोल्ले ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये 7 हजारांहून अधिक लोकांनी एकाच वेळी योगासने केली.
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, पतंजली योग विद्यापीठाचे कर्नाटक प्रभारी योगाचार्य भवरलाल आर्य, बसवप्रसाद जोल्ले यांनी रोपाला पाणी पाजून अग्निहोत्र केले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार शशिकला जोल्ले यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी योग, प्राणायाम, आयुर्वेदाचा शोध देशातील जनतेला निरोगी ठेवण्यासाठी लावला. या दिवशी केवळ भारतच नाही तर अनेक देशांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. आज जोल्ले ग्रुपच्या वतीने शिवशंकर जोल्ले इंग्लिश मीडियम स्कूल, एकसंबाच्या प्रांगणात जागतिक योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 7 हजार पेक्षा जास्त लोक सहभागी झाले आहेत. त्यामुळे उत्तम आरोग्य व मानसिक शांती प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.
.
यावेळी ज्योतिप्रसाद जोल्ले, प्रिया जोल्ले, भाजप प्रदेश रयत मोर्चा उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवडे, जिल्हा सरचिटणीस सतीश आप्पाजीगोळ, जोल्ले ग्रुपच्या विविध शाखांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments