मी आरोग्यमंत्री असताना राज्याच्या आरोग्य खात्यात सुधारणा करून नव्या योजना आणल्या. मात्र नंतरच्या सुधाकर यांनी त्या सुरु ठेवल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य खात्यात काही अडचणी निर्माण झाल्या असा गंभीर आरोप साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी केला.
साख्रमंत्री शिवानंद पाटील यांनी आज बेळगावातील गणेशपूर येथील एस निजलिंगप्पा साखर संशोधन संस्थेला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मागील काँग्रेस सरकारमध्ये मी आरोग्यमंत्री असताना अनेक नवीन सुधारणा केल्या. मात्र नंतरच्या भाजप सरकारमध्ये मंत्री झालेल्या श्रीरामुलू आणि सुधाकर यांनी त्या सुरु ठेवल्या नाहीत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. साख्रमंत्री पदावर खुश आहेत का? या प्रश्नावर शिवानंद पाटील म्हणाले की, आठ-आठवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्यांना पक्षाने मंत्रिपद दिलेले नाही, मला सहावेळा निवडून आलेल्याला मंत्रिपद दिले याबद्दल मी पक्षाचा कृतज्ञ रहायला नको का?
मिळाले त्यात मी समाधानी आहे, नव्या खात्यात नवनवीन सुधारणा करणार आहे. दिनेश गुंडूराव आमचेच आहेत, त्यांना माझ्याकडील माहिती देईन. बाईट.
दक्षिण कर्नाटकातील जुन्या बसेस उत्तर कर्नाटकाला दिल्या जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर, उलट उत्तर कर्नाटकात परिवहन सेवा चांगली आहे. दक्षिण कर्नाटकात खासगी बससेवेचे अधिक वर्चस्व आहे आणि जुन्या बसेस चांगल्या स्थितीत असतील तर त्या वापरायला काय हरकत आहे? असेल त्यात चालवले पाहिजे आणि नसेल ते आणले पाहिजे. सरकार त्यादृष्टीनं पावलं टाकेल. बेंगळूरमध्ये इलेक्ट्रिक बसदेखील सुरु केल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी साखर आयुक्त शिवानंद कटगेरी, निजलिंगप्पा साखर संस्थेचे संचालक आर बी खंडगावे व अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments