हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करू देण्याची विनंती करणारी विधान परिषद सदस्य एस व्ही संकनूर यांनी दाखल केलेका अर्ज धारवाड उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.
पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करून विधान परिषदेवर निवडून आलेले एस व्ही संकनूर, धारवाड, गदग, हावेरी आणि कारवार जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. संकनूर यांनी गदग नगरपरिषदेच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत मतदानाचा हक्क हस्तांतरित केला होता. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांनी, संकनूर यांना मतदान करता येणार नाही, अशी नोटीस बजावली होती. संकनूर यांनी आयुक्तांच्या नोटीसवर सवाल करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संकनूर यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून, त्यांना हुबळी, धारवाड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली आहे.


Recent Comments