Belagavi

बेळगावात योग दिनानिमित्त ‘योगा वॉक’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

उद्या आंतरराष्ट्रीय योगदिन असल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी बेळगावात आज ‘योगा वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध महाविद्यालयांच्या सुमारे हजारांवर विध्यार्थ्यानी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी यात भाग घेतला.

आंतरराष्ट्रीय योगदिन असल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज ‘योगा वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चन्नम्मा चौकात राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी आणि अपर जिल्हाधिकारी शांतला यांच्या हस्ते हिरवे निशाण दाखवून योगफेरीला चालना देण्यात आली. यावेळी योगगुरू बाबा रामदेव यांच्या वेशातील मुलांनी पाहुण्यांना रोपे देऊन स्वागत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फ्लो
यावेळी बोलताना खासदार इरण्णा कडाडी म्हणाले की, उद्या उद्या आंतरराष्ट्रीय योगदिन असल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी बेळगावात आज ‘योगा वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. मानवाला स्वस्थ आणि आरोग्यपूर्ण ठेवणाऱ्या प्राचीन भारतीय योगपद्धतीची जगाला ओळख करून देण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. योग ही माणसाला सतत आरोग्यपूर्ण राहण्यास उपयुक्त ठरणारी पद्धती आहे. सर्वानी योगाचरण करून आरोग्यपूर्ण रहावे यासाठी उद्या आंतरराष्ट्रीय योगदिन पाळण्यात येणार आहे. त्यात सर्वानी सहभागी व्हावे यासाठी जागृती करण्यासाठी आज या योगफेरीचे आयोजन केले असून त्याला चांगला प्रतिसाद लाभला ही समाधानाची बाब आहे.

यावेळी बोलताना जिल्हा आयुष्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुनधोळी यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त उद्या सुवर्णसौध येथे 45 मिनिटांचा योग प्रात्यक्षिक कार्यक्रम ठेवला आहे. त्यात सर्वै सहभागी व्हावे यासाठी जागृती करण्यासाठी आज या फेरीचे आयोजन केले. आहे. फेरीला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. शहरातील भरतेश, केएलई कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय, शेख होमिओपॅथी महाविद्यालय, एसबीजी. जैन, सरदार्स अशा विविध कॉलेजच्या हजारांहून अधिक विध्यार्थ्यानी या फेरीत भाग घेतला आहे. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा आयुष खाते, आरोग्य व कुटुंबकल्याण अशा विविध खात्यांच्या सहकार्याने आजची जागृतिफेरी व उद्याच्या नवव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन केले आहे. सर्वानी त्यात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले. बाईट.
जिल्हाधिकारी कार्यालय, चन्नम्मा चौक, काकतीवेस रोड अशा मार्गाने निघालेल्या योगफेरीची सांगता जिल्हा पंचायतीच्या आवारात झाली.

Tags: