राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, राज्यातील मंत्री म्हणून माझ्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी असली तरी मला या पदावर नेणाऱ्या बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुट्टलवाडी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री मारुती मंदिराच्या इमारतीचे उद्घाटन व महाप्रसाद कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर त्या बोलत होत्या . ग्रामीण भागातील समस्या आणि करावयाच्या विकासकामांची यादी लवकरच जनतेच्या सहकार्याने तयार करण्यात येणार आहे. कोणताही कोपरा बाकी न ठेवता त्याचा विकास केला जाईल. या क्षेत्राला अधिक अनुदान आणून मी माझे स्वप्न साकार करणार आहे. येत्या काही दिवसांत आठवड्यातील 4 दिवस संपूर्ण राज्याचा दौरा करूनही आठवड्याचे शेवटचे तीन
दिवस बेळगाव ग्रामीण भागात राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षात 103 मंदिरे विकसित करण्यात आली आहेत. देवाच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघातील जनतेच्या पाठिंब्याने मी प्रचंड बहुमताने निवडून आले . इतकेच नाही तर राज्यात मंत्रीही झाले आहे . मला मोठ्या पदावर पाठवल्याबद्दल तुमचे ऋण

मी फेडू शकत नाही. हेब्बाळकर म्हणाल्या कि , मीनसले तरी मुलगा मृणाल तुमच्या सेवेत २४ तास तत्पर असेल.
दरम्यान, मंदिर समितीतर्फे लक्ष्मी हेब्बाळकर यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी गावातील ज्येष्ठ नेते लक्ष्मण कणबरकर, मारुती दोड्डलकप्पगोळ , भरमा कणबरकर, सुधीर देसाई, संतोष देसाई, गुंडू देसाई, युवराज कदम, शंकरगौडा पाटील, युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बालकर, मनोहर बेळगावकर महेश सुगंणावर , यलाप्पा ढेकोळकर आदी उपस्थित होते.


Recent Comments