बस थांबवण्यासाठी इशारा करूनही चालकाने बस थांबवली नसल्याच्या रागातून तृतीयपंथीयांनी हायड्रामा केल्याची घटना रायबाग तालुक्यातील हारुगेरी बसस्थानकावर रविवारी घडली.

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगेरी शहरात चालकाने बस न थांबवल्याच्या रागाने तृतीयपंथीयांनी हंगामा केल्याची घटना घडली. बसस्थानकावर उभ्या
असलेल्या तृतीयपंथीयांनी बस येताच बसला हात लावून बडवले. पण बस थांबली नाही म्हणून चालकावर आरडाओरड करत गोंधळ घातला. काँग्रेस सरकारने 5 हमी जाहीर केल्या. ज्यात शक्ती योजनेतून महिलांना मोफत बस प्रवासाची सोय केली. आम्हा तृतीयपंथीयांना देखील बसमध्ये घेतले पाहिजे,
मात्र, चालकाने बस न थांबवता आमच्याकडे दुर्लक्ष केले, हे निंदनीय आहे. आम्हीही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस पक्षाला मतदान केले, आम्हीही माणसेच आहोत ना?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.


Recent Comments