Belagavi

जायंट्स मेनचे रक्तदान शिबीर संपन्न कै.नाना चुडासमा जयंतीनिमित्त आयोजन

Share

बेळगाव:जायंट्स इंटरनॅशनलचे संस्थापक, मुंबईचे माजी नगरपाल कै.नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने केएलई रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

रक्तदान शिबिर उदघाटन प्रसंगी कै नाना चुडासमा यांच्या प्रतिमेस अध्यक्ष सुनिल मूतगेकर आणि मदन बामणे यांच्याहस्ते पुष्यमाला घालून वंदन करण्यात आले.

यावेळी सचिव लक्ष्मण शिंदे यांनी प्रास्ताविक करताना जगभरात अनेक शोध लागले परंतु रक्त तयार करण्याचा शोध लागला नाही. रुग्णांना जर रक्त हवे असेल तर ते सुदृढ मानवी शरीरातील रक्तावरच अवलंबून रहावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे असे सांगितले.
यावेळी केएलई रक्तपेढीचे डॉ. बसवराज देवगी, डॉ आनंद भगवंतन्नावर व सविता पाटील यांनी रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी मेहनत घेतली.

या रक्तदान शिबिरात उपाध्यक्ष अरुण काळे, अविनाश पाटील,संजय सूर्यवंशी,सुनिल पवार,अशोक हलगेकर,पुंडलीक पावशे,अभय पवार,सुभाष नांदीवडेकर,नारायण किटवाडकर,तुषार भोसले,विनायक पाटील,अमर बिरजे,जीवन कदम व
काशिनाथ कदम या रक्तदात्यानी रक्तदान केले.


यावेळी सुनिल भोसले ,मधु बेळगावकर , अजित कोकणे, राजू बांदिवडेकर,जयवंत पाटील,आनंद कुलकर्णी उपस्थित होते.

Tags: