Belagavi

नंदगड येथील प्रभाग दोनमध्ये पाणी, स्वच्छतेची समस्या गंभीर

Share

खानापूर तालुक्यातील नंदगड येथील प्रभाग क्र. दोनमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची समस्या गंभीर बनल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नंदगड येथील प्रभाग क्र. दोनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्यांतीवर झाली आहे. आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी नळाला येत आहे तेही अतिशय कमी दाबाने. एक घागर भरायला तासभर लागण्याइतपत कमी दाबाने पाणी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे महिलावर्गाची कुचंबणा होत आहे. त्याशिवाय कचऱ्याची समस्यादेखील गंभीर झाली आहे. कचऱ्याची उचल ग्रामपंचायतीकडून वेळच्यावेळी केली जात नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून रोगराईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात नंदगड ग्रामपंचायतीसमोर चारवेळा निदर्शने करून निवेदन, अर्ज देण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. प्रभागाच्या नगरसेवकाने देखील या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.


यावेळी गडीनाडू रक्षण वेदिकेच्या नंदगड शाखेचे अध्यक्ष जहीर अब्बास बेपारी, माजी ग्रामपंचायत सदस्य दस्तगीर खानापुरी, समाजसेवक हमीद मुल्ला आदी उपस्थित होते.

Tags: