खानापूर शहराजवळील रुमेवाडी गावातील चौगले बंधूंच्या स्मशानभूमीत एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सकाळी फिरायला निघालेले नागरिक हे दृश्य पाहून अचंबित झाले. चक्क स्मशानात एका विदेशी पर्यटकांने रात्रभर विश्रांती घेतल्याचे दृश्य पाहून स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले.


होय, रुमेवाडी-अनमोड रस्त्यावर चौगले बंधूंनी आपल्या शेतजमिनीत स्मशानभूमी बांधून तेथे शेड बांधले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना हे शेड सहज दिसते. याचठिकाणी रात्री एका परदेशी पर्यटकाने मुक्काम करून सकाळी पुढील प्रवासाला सुरुवात केली. मस्तपैकी स्मशानातील शेडमध्ये आपली बुलेट बाईक पार्क करून झोपाळ्यावर विश्रांती घेतल्याचे दृष्य पाहून स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. हे खरोखरच एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी हे चांगले उदाहरण आहे अशी चर्चा फिरायला गेलेल्या लोकांमध्ये सुरु होती. सध्या या परदेशी पाहुण्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.


Recent Comments