Chikkodi

सदलगा शहरात मोफत नेत्र तपासणी शिबीर

Share

अब्दुल कलाम फौंडेशनने चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरातील कनक भवन येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला रुग्णांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा 200 हून अधिक लोकांनी लाभ घेतला.

सांगलीचे कुल्लोळीकर नेत्र रुग्णालय, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा समाज सेवा संघ, राणी चेन्नम्मा महिला युवा समाज सेवा संघ, अरण्यसिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट समिती, ज्ञानयोग महिला समाज सेवा संघ आदी संघांच्या वतीने प्रेरणा निवारा येथे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा 200 हून अधिक लोकांनी लाभ घेतला.


यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. कामरान शेख व त्यांच्या पथकाने नेत्र तपासणी केली. साहित्यिक डॉक्टर पी एम भोजी अध्यक्षस्थानी होते. अब्दुल कलाम संघाचे अध्यक्ष अझरुद्दीन शेखजी यांनी प्रास्ताविक केले. राजू सनदी, शिवराज खिलारे, शौकत आवटी, अशोक रामनकट्टी, कुमा पवार, तेजा मुडासे, प्रियांका मंगसुळे, रविगुरू स्वामी आदी उपस्थित होते.

Tags: