कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार तर स्वामीजी गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेळगाव तालुक्यातील काकती गावाजवळ झाला.
या अपघातात बेळगाव तालुक्यातील शिवापूर गावातील मुप्पिन काडसिद्धेश्वर मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी गंभीर जखमी झाले आहेत. बेळगावात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वामीजी बेळगावात येत होते. राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या विरोधात आज विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाच्या वतीने बेळगावात आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपल्या दोन सेवकांसह बेळगावकडे निघालेल्या स्वामीजींच्या गाडीला रस्त्याच्या मधोमध अपघात झाला. वाहनात बसलेले स्वामीजींचे दोन सेवक या भीषण अपघातात मरण पावले. अपघाताची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन काडसिद्धेश्वर स्वामीजी जिल्हा रुग्णालयात पाठवले.
काडसिद्धेश्वर स्वामीजींवर बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. स्वामीजींच्या दोन्ही सेवकांचे मृतदेह बीम्स शवागारात पाठवले आहेत. मृत सेवकांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. काकती पोलीस त्यांची ओळख पटवीत आहेत.
Recent Comments