Banglore

ऑगस्ट 15 किंवा 16ला राज्यात जारी करणार गृहलक्ष्मी योजना : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

गृहलक्ष्मी योजनेबाबत कसलाही गोंधळ नाही, ऑगस्ट 15 किंवा 16ला राज्यात योजना जारी करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी बेंगळुरू येथे गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. महसूल मंत्री कृष्णा बायरेगौडा, ग्रामविकास, आयटी बीटी मंत्री प्रियांक खर्गे, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विभागाच्या प्रधान सचिव मंजुळा आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, गृहलक्ष्मी योजना जारी करण्याबाबत कसलाही गोंधळ नाही. कुटुंबप्रमुख महिलेला योजनेचे पैसे मिळावेत अशी आमची इच्छा आहे. कुटुंबप्रमुख महिलेला जर योजनेचा लाभ घरातील दुसऱ्या महिलेला मिळावा असे वाटत

असेल तर तो पर्याय देण्याचा निर्णय झाला आहे. लाभार्थी महिलेचा बँक खाते नंबर आणि आधारकार्ड लिंक केल्यावर योजनेचा लाभ मिळू लागेल. योजनेसाठी अर्ज करण्यास कसलीही डेडलाईन दिलेली नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असेल. येत्या आठ-दहा दिवसात सर्व काही सुरळीत होऊन ऑगस्ट 15 किंवा 16ला राज्यात योजना जारी करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बाईट.

Tags: