Agriculture

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटयूटला टाळे ठोकून शेतकऱ्यांची निदर्शने

Share

सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत आंदोलकांनी शुक्रवारी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटयूटच्या कार्यालयाला टाळे ठोकून निदर्शने केली.

सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत बेळगावातील गणेशपूर रोड येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटयूटच्या कार्यालयाला टाळे ठोकून ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. रामदुर्ग तालुक्यातील शिवसागर, कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर्स कारखान्याने ऊसाची थकीत बिले अदा न केल्याच्या निषेधार्थ रयत संघटनेच्या नेत्यांनी आंदोलन केले. 600 हून अधिक शेतकर्‍यांची 8 कोटींहून अधिकची थकबाकी आहे.


या शेतकऱ्यांनी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटयूटच्या आयुक्तांकडे थकीत बिल मिळवून देण्याची मागणी केली होती. आयुक्त शिवानंद काळकेरी यांनी शेतकऱ्यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावले. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता शेतकरी ठरलेल्या वेळी कार्यालयात येऊनही स्वतः कार्यालयात न येणाऱ्या साखर आयुक्तांचा शेतकऱ्यांनी निषेध केला.
ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी मिळाली नसल्याची तक्रार केली होती, ते 2016-17 व्या आणि 2017-18 या वर्षातील उसाची थकीत बिले मिळावीत म्हणून लढा देत आहेत.

Tags: