अवघ्या अडीज वर्षाच्या बेळगावच्या मानवी भरत निलजकर या चिमुरडीच्या पाठांतराचा क्षमतेने स्तिमित व्हायला होते. बालवाडीत शिकवली जाणारी गाणी अचूक पाठ करून 5 मिनिटांत तीन भाषांमध्ये गायन केले. तिच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.
बेळगाव, कर्नाटक येथील मानवी भरत निलजकर या २८ मे २०२० रोजी जन्मलेल्या चिमुकलीने तीन भाषांमधील ऱ्हाईम्स तोंडपाठ केले आहेत. नर्सरीमध्ये शिकवल्या जाणाऱ्या या ऱ्हाईम्स जास्तीत जास्त संख्येने पाठ करण्याचा विक्रम तिने केला आहे.
तिने इंग्रजीमध्ये 17, हिंदीमध्ये 5 आणि मराठीमध्ये 2 अशा 24 नर्सरी राइम्सच्या पहिल्या काही ओळी पाठ केल्या. 13 मे 2023 रोजी त्या अवघ्या 5 मिनिटांत म्हणून दाखवल्या आहेत.
पुष्टी केल्यानुसार 2 वर्षे 11 महिने आणि 15 दिवस नेते तिचे वय आहे. या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे.


Recent Comments