Agriculture

इंगळीत आवडत्या गायीचा चोळीपूजन कार्यक्रम; सवाष्णींकडून विशेष पूजा

Share

चिक्कोडी तालुक्यातील नवी इंगळी गावात अरुण बामणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घरात प्रेमाने वाढवलेल्या गायीचा चोळीपूजन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात कुटुंबातील सर्वानी सहभागी होऊन विशेष उपस्थिती लावली.

गेल्या चार वर्षांपासून बामणे कुटुंबीयांनी त्यांच्या घरी पाळलेली गाय सध्या गाभण आहे. त्यामुळे हिंदू परंपरेनुसार घरातील मुलीप्रमाणे त्यांनी या गायीचे चोळीपूजन केले. हा कार्यक्रम सर्व गावकऱ्यां भावला. या कार्यक्रमाला गावातील सर्व वडीलधारी मंडळी उपस्थित होती.

त्यांनी गायीची विशेष पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि पंचपक्वान्नांचा घास गायीला प्रेमाने भरवला. या विशेष सोहळ्याचे शेकडो ग्रामस्थ साक्षीदार झाले. बामणे कुटुंबीयांनी कार्यक्रमात आलेल्या सर्वांना गोड खाऊ दिला. अशोक बामणे, मोहन बामणे, अरुण बामणे, भीमा घोसरवडे, मुरारी बामणे, पौरस बामणे, किरण जत्राटे, धनंजय बामणे, युवराज धोनवडे यांच्यासह अनेक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Tags: