Belagavi

53 नवे आमदार आणि 9 मंत्र्यांना अपात्र ठरवा : भीमाप्पा गडाद

Share

विधानसभेवर निवडून आलेले 53 नवे आमदार आणि 9 मंत्र्यांनी संविधानानुसार शपथ घेतलेली नाही. संविधानविरोधी शपथ घेतलेल्या आमदार आणि मंत्र्यांना अपात्र ठरवा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमाप्पा गडाद यांनी केली.

गुरुवारी शहरातील कन्नड साहित्य भवनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद म्हणाले की, विधानसभेवर निवडून आलेले 53 नवे आमदार आणि 9 मंत्र्यांनी संविधानानुसार शपथ घेतलेली नाही. संविधानानुसार शपथ न घेतलेल्या आमदार व मंत्र्यांना अपात्र ठरवले पाहिजे, तसेच त्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सुविधांमध्ये कपात करावी, अशी मागणी त्यांनी केली. या आमदारांना व मंत्र्यांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांना पत्र लिहिण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी किंवा कोणतीही पात्रता नसताना किंवा अपात्रता असताना सदस्य म्हणून बसणे हे घटनेच्या विरोधी आहे. बाईट.

Tags: