Accident

नवपरिणीत दांपत्यावर काळाचा घाला

Share

तम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नियती किती क्रूर आहे याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. अंगाची हळदही न निघालेल्या नवपरिणीत दांपत्याचा विजापूरजवळ अपघातात मृत्यू झालाय.

होय, लग्नाला महिनादेखील उलटायच्या आत एका दांपत्याला या जगाचा निरोप घ्यावा लागलाय.


विजापूर शहराच्या हद्दीत सोलापूर बायपासजवळ रात्री उशिरा दुचाकी आणि कॅंटर यांच्यात झालेल्या धडकेत 31
वर्षीय होनमल्ल तेरदाळ आणि त्यांची पत्नी 24 वर्षीय गायत्री यांचा जागीच मृत्यू झाला. शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या होनमल्ल आणि गायत्री यांचा विवाह गेल्या 22 मे रोजी झाला होता. नातेवाइकांच्या मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून परतत असताना हा अपघात झाला आणि लग्नाच्या 24 दिवसांतच या जोडप्याचा मृत्यू झाला. या घटनेने विजापूर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजापूर वाहतूक पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

Tags: