Belagavi

पाऊस लांबल्याने उत्तर कर्नाटकात दुष्काळी परिस्थिती

Share

राज्यात मान्सूनला उशीर झाल्यामुळे बहुतांश जलाशय कोरडे पडले आहेत. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. विशेषतः उत्तर कर्नाटकात पाऊस लांबल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

होय, गेल्या वेळी भरपूर पाऊस झाला होता, मात्र यावेळी पावसाने दडी मारल्याने बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकात दुष्काळ पडण्याची भीती आहे. हुक्केरी तालुक्यातील हिडकल गावात घटप्रभा नदीवर बांधण्यात आलेल्या हिडकल जलाशयाची पातळी अर्ध्याहून अधिक खाली आल्याने सर्वत्र पाण्याची समस्या निर्माण झाली असून शहरातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
बेळगाव जिल्ह्यासह बागलकोट, जमखंडी, मुधोळ, लोकापूर यासह अनेक भागांना पाणीपुरवठा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर या गावांतील जनता व पशुधन पिण्याच्या पाण्यासाठी हतबल झाले आहे. आणखी एक आठवडाभर जरी पाऊस पडला नाही तर पिण्यासही पाणी मिळणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.


सुमारे 51 टीएमसी क्षमता असलेल्या हिडकल धरणात आता केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक असून, त्यापैकी दोन टीएमसी मृतसाठा असून केवळ दोन टीएमसी पाणी वापरण्यास परवानगी आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी, गोकाक, मुडलगी व बेळगाव शहरावर आपत्ती ओढवण्याची शक्यता आहे.


दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणारा मान्सूनचा पाऊस यावेळी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बराच लांबला आहे. उत्तर कर्नाटकात तर पावसाचे नामोनिशाणही नाही. त्यामुळे शेतीची कामेही सुरू झालेली नाहीत. फ्लो.

Tags: