Vijayapura

सवदी गेल्याने भाजपला उत्तर कर्नाटकात फटका : खा. जिगजिनगी

Share

जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेल्याचा भाजपला काही प्रमाणात फटका बसला आहे. उत्तर कर्नाटकात जरा जास्त बसलाय अशी प्रतिक्रिया विजापूरचे खासदार रमेश जिगजिनगी यांनी दिली.

या दोन नेत्यांच्या पक्षत्यागामुळे लोकसभा खासदार निवडणुकीवर परिणाम होणार नाही असा दावा खा. जिगजीनगी यांनी केला. गॅरंटीच्या मागे लागून लोकांनी काँग्रेसला निवडून दिले आहे.

हमीवर काँग्रेस राज्य सरकार चालवते आहे. अशातऱ्हेने काँग्रेस देशच विकून टाकेल अशी टीका त्यांनी केली. यावेळीही मोदींना हरवता येणार नाही. अर्थात केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आले तर मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील याची 100% गॅरंटी आहे असे खा. जिगजिनगी म्हणाले.

Tags: