Belagavi

काँग्रेसच्या योजनांच्या अर्जासाठी पैसे देण्याची गरज नाही : प्रभावती मास्तमर्डी

Share

काँग्रेस सरकारच्या सर्व गॅरंटी योजना पूर्णत: मोफत असून त्यांचा लाभ मिळवून देतो असे सांगून काही काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते व अन्य व्यक्ती सर्वसामान्यांकडून पैशांची मागणी करत आहेत. त्यांना बळी पडू नये असे आवाहन काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी केले.

बेळगाव शहरातील जिल्हा ग्रामीण काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी, काँग्रेस सरकारच्या पाच मोठ्या योजनांपैकी स्त्री शक्ती योजना सुरू केल्याबद्दल जनतेच्या वतीने सरकारचे आभार मानले.
सरकारी हमी योजना ऑनलाइन आणि ऑफलाइनद्वारे पैसे न घेता मंजूर केल्या जातात. त्यामुळे त्यासाठी कोणी कोणाला पैसे देण्याची गरज नाही. जर काही दलाल लोकांनी योजना मंजुरीसाठी पैसे मागितल्यास त्याबाबत तक्रार करता येते असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही एजंटच्या माध्यमातून सरकार कोणत्याही योजनेसाठी पैसे घेत नसल्याचे सांगून या योजनांची योग्य माहिती घेण्यासाठी जनतेला काँग्रेसच्या कार्यालयात येऊन माहिती मिळवून अर्ज करता येईल असे त्यांनी सांगितले.

 

एकंदर, राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देतो म्हणून सांगून लुटणाऱ्या दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी केले आहे.

Tags: