Belagavi

बियाणांचा पुरेसा साठा, वितरणासाठी दक्ष राहून काम करा : कृषिमंत्री चेलुवरायस्वामी

Share

राज्यात मान्सूनला उशीर झाल्याने पेरण्याही लांबल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडताच सर्वत्र एकाच वेळी पेरणीला सुरुवात होणार आहे. अशावेळी बियाणे व खताचा तुटवडा भासू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. खराब बियाणे वाटप झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा कृषी विभागाचे मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी दिला.


मान्सूनच्या पूर्वतयारीबाबत जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या विभागस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कृषिमंत्री चेलुवरायस्वामी म्हणाले की, पेरणी, बियाणे व खतांची मागणी, पुरवठा आणि वितरण यावर अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवावे. पावसाच्या विलंबामुळे शेतकरीही चिंतेत आहेत. त्यामुळे बियाणे-खत वितरणाबाबत तक्रारी येऊ नयेत, याची काळजी घ्यावी.
पेरणीसाठी बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा असल्याने कोणतीही अडचण येऊ नये. सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने व शिस्तीने काम करावे. क्यू आर कोडद्वारे बियाणे वाटप केले जात आहे, काही वेळा तांत्रिक अडचण आल्यास पर्यायी व्यवस्था करावी. यात काही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री चेलुवरायस्वामी यांनी दिला. बाइट.
बियाणे वितरणात निकृष्ट बियाणे वाटप होत असल्याच्या तक्रारी काही जिल्ह्यांतून येत आहेत. प्रशासनाने याकडे बारकाईने लक्ष द्यावे. अशा घटनांची पुनरावृत्ती होता कामा नये. अशी घटना घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा मंत्री चे वरायस्वामी यांनी दिला.


बियाणे-खत विक्री केंद्रांची स्वत: तपासणी करून साठा व पुरेशा प्रमाणात वितरणासाठी कार्यवाही करावी, असे सांगून ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून आकडेवारी सादर करावी. रिलीफ पोर्टलवर नोंद करावी.
शेतकर्‍यांच्या तक्रारी लवकरात लवकर मिटाव्यात यासाठी हेल्पलाइन केंद्रे स्थापन करावीत. तक्रारींना तत्काळ प्रतिसाद द्यावा असे निर्देश त्यांनी दिले. बाइट.
बैठकीला कृषी संचालक जी टी पुत्र, अतिरिक्त कृषी संचालक सी बी बालरेड्डी, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अतिरिक्त जिल्हाधिकारी के टी शांतला आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत बेळगावी विभागातील विजापूर, बागलकोट, गदग, हावेरी, बेळगाव, उत्तर कन्नड, धारवाड या जिल्ह्यांचे कृषी सहसंचालक सहभागी झाले होते.

Tags: